
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
गेल्या काही दिवसांपासून विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करीत आहे. खासदार राहुल गांधी यांना चौकशीच्या नावाखाली नाहक मन:स्ताप दिला जात आहे. या दडपशाही विरुद्ध जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी १७ जून रोजी तीव्र आंदोलन केले जाणार आहे.
आझाद मैदानालगत महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळून दुपारी १२ वाजता या आंदोलनाला प्रारंभ होणार आहे. खासदार राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालयामार्फत नोटीस दिली गेली होती. त्यानुसार ते १३ जून रोजी ईडी कार्यालयात हजर राहिले. मात्र सक्तवसुली संचालनालय त्यांना दररोज बोलावून नाहक त्रास देत आहे. सतत चौकशीसाठी बोलावणे, दिल्ली येथील अखील भारतीय काँग्रेस कमिटी कार्यालयाला पोलिसांकडून घेराव घालणे, वरिष्ठ नेत्यांना पोलिसांमार्फत मारहाण करणे, त्यांना डांबून ठेवणे हा केंद्रातील मोदी सरकारच्या दडपशाहीचाच भाग असल्याचे प्रदेश काँग्रेसने बुधवारी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी १७ जून रोजी महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्याच निर्देश प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्हास्तरावरही शुक्रवारी महात्मा फुले यांच्या पुतळ्या जवळ आझाद मैदान,यवतमाळ येथे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीमार्फत देण्यात आली. यवतमाळात होणाèया या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी,युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, किसान काँग्रेस व सर्व काँग्रेस सेल पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, सर्व तालुकाध्यक्षांनी पूर्ण ताकदीनिशी या आंदोलनात उतरावे, असे आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल्लभाऊ मानकर यांनी केले आहे.
