
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी प्रतिनिधींची निवड करण्याबाबत ग्रामविविध कार्यकारी सहकारी संस्था वडकी शाखेच्या वतीने निवड प्रक्रियेत दिलीप बांगरे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तथा शेतकरी यांचा दुवा असणाऱ्या वडकी या ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेतून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी एका बँक प्रतिनिधीची निवड केली जाते. यंदा बँक प्रतिनिधी म्हणून दिलीप बांगरे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. यावेळी दिलीप बांगरे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
सहकारी सोसायटीचे सचिव अनिल कुमरे यांच्या उपस्थितीत २९ डिसेंबरला ग्रामपंचायत कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत सहकारी सोसायटीचे अध्यक्ष एकनाथ भोयर, उपाध्यक्ष सचिन फुटाणे, सदस्य त्र्यंबक बर्डे, नारायण फुटाणे, विनोद देठे, मयूर कडू, शेख इस्माईल शेख सत्तार, नरेश आत्राम, सागर इंगोले, शंकर कोरडे, राधा भोयर, रत्नमाला उदार उपस्थित होते. या निवड प्रक्रियेला गावातील मनोज भोयर, दिलीप कडू यांनी सहकार्य केले
