
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव : भारतीय जनता पक्ष राळेगाव तालुक्याच्या वतीने आज दिनांक १५ फेब्रुवारी रोजी शहरातील क्रांती चौक येथे दुपारी १२ वाजता तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आयोजित करण्यात आले.
या निषेध सभेचे संचालन महामंत्री अभिजीत कदम यांनी केले. कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष सौ. छाया ताई पिंपरे, माजी नगर पंचायत अध्यक्ष बबनराव भोंगारे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रसाद ठाकरे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष राजु भाऊ गुंडेचा, अॅड. प्रीतेश वर्मा, शहर अध्यक्ष शुभम मुके, संदीप पेंदोर आदी पदाधिकाऱ्यांनी निषेधपर भाषणे केली.
सभेदरम्यान उपस्थित वक्त्यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांच्या राष्ट्रनिर्माणातील कार्याचा गौरव करत अशा प्रकारच्या वक्तव्यांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून अशा विधानांमुळे जनतेच्या भावना दुखावल्या जात असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले.
Box…👇👇
“छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या कार्याची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. अशा प्रकारची विधाने करून महाराष्ट्राच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न होत असेल तर भारतीय जनता पक्ष कधीही शांत बसणार नाही. महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही.”
–तालुका अध्यक्षा सौ. छाया ताई पिंपरे
सभेदरम्यान कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला व भविष्यात अशा प्रकारची वक्तव्ये करणाऱ्यांविरोधात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
या वेळी डॉ. कृणाल भोयर, सुधाकर गेडाम, सचिन चौहाण, संदीप तेलंगे, गणेश देशमुख, उषाताई भोयर, कविताताई गेडाम, अनिलजी वर्मा, अशोक वर्मा, डॉ. अशोक थोडगे, डॉ. कोकरे, निलय घिनमीने, सौरभ पवार, प्रदीप भोयर, नितीन झाडे, अरुण शिवणकर, प्रकाश खुडसंगे, प्रतीक काळे, अरुण लोखंडे, प्रविण शेलोटे, अरुण देहारे, चौधरी भाऊ, संकेत झाडे, किन्नाके सर, शुभंम तोटे, गौरव केवटे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
