लोणी येथे वंचित बहुजन आघाडी शाखा स्थापन व उदघाटन सोहळा संपन्न

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील लोणी येथे वंचित बहुजन आघाडी ची शाखा स्थापना करण्यात आली, ढोल-ताशाच्या गजरात व मोठ्या उत्साहात तसेच जनतेच्या असंख्य जमावात झाली,यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष धनराज लाकडे तालुका अध्यक्ष श्री.ऍंड.अफसर काझी,वंचित बहुजन आघाडी राळेगाव विधानसभा प्रमुख डॉ.ओमप्रकाश फुलमाळी,वंचित बहुजन आघाडी राळेगाव तालुका कार्याध्यक्ष लोकेश दिवे, तालुका उपाध्यक्ष सूरज थुल गोपीचंद ढाले , ऍड दीक्षांत खैरे , या सर्व प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत संपन्न झाला असून लोणी शाखा अध्यक्ष पदी दामुजी काळे, शाखा उपाध्यक्ष पदी वंदन भगत, शाखा सचिव बंडुजी धोंगडे, शाखा महासचिव गणेश अडकीने, शाखा संघटक महेंद्र लढे, शाखा कोषाध्यक्ष बालमित्र कांबळे यांच्या सह अनेक नियुक्त्या करून नियुक्ती पत्र देण्यात आले, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी तडफदार व सक्षम युवा उमेदवार देणार असून कामाला लागण्याच्या सूचना तालुका अध्यक्ष ऍड. अफसर काझी, कार्याध्यक्ष लोकेश दिवे, विधानसभा प्रमुख डॉ.ओमप्रकाश फुलमाळी यांच्यामार्फत देण्यात आल्या.