५२ पत्ते जुगार अड्ड्यावर छापा

बिटरगांव (बु) प्रतिनिधी//शेख रमजान

ढाणकी शहरा लगत असलेल्या टेभुरदरा ता. उमरखेड जि. यवतमाळ येथे दुपारी अडीच वाजता दिनांक ०३/०४/२०२४ रोजी पोउपनि शिवाजी टिपुर्णे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून एक्का बादशहा नावाचा जुगार पैशांची बाजी लावुन हारजीतचा खेळ खेळत असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पथकासह छापा टाकून सहा ५२ पत्ते जुगार खेळणारे ०८ इसमांवर कार्यवाही करून ५४,८४०/- रू मुदद्देमाल जप्तकरून
धुळबा नागदेव बोरकर वय (३५) दत्ता नामदेव ब्रम्हटेके वय (५० ),नारायण देवराव ब्रम्हटेके वय (६०) ,इंदल बळीराम चव्हाण वय (४५ ),गुणाजी भिमराव वाढवे वय (४२) रामराव महादु मुकाडे वय( ६०) संदीप गणेश राठोड वय (३०) व दत्ता पुजाराम घावस वय (२४)सर्व रा. टेभुरदरा ता. उमरखेड जि. यवतमाळ यांच्यावर २०२४ कलम १२ अ मजुका नुसार ढाणकी बिटरगांव (बु) शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई
मा.डॉ. पवन बन्सोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा.हनुमतराव गायकवाड उप.वि.पो.अ. उमरखेड, यांचे मार्गदर्शनात ठाणेदार स.पो.नि. प्रेमकुमार केदार यांचे आदेशावरून पोउपनि शिवाजी टिपुर्णे तसेच ना.पो.कॉ/११६२ हाके, पो. कॉ/१०१७ कुसराम, पो. कॉ/२६५४ मरके यांनी केली. पुढील तपास सफी/१६४४ गजानन कनाके हे करीत आहे.