

महागाव :-संजय जाधव
सुधाकरराव नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय फूलसावंगी येथे वसंतराव नाईक जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या प्रांगणात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य विनोद राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला आणि वृक्षांचे रोपण केले. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांनी मिळून वृक्ष लागवड केली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच वृक्ष संवर्धनाच्याउपाययोजनांची माहिती दिली. शाळेच्या आवारात हरित सेना शिक्षक व विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली. वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाची आठवण ठेवत, या दिवसाचे महत्त्व पटवून देण्यात आले. यामध्ये त्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली गेली त्यांच्या आदर्शाचा आदर आणि करण्याचे या आवाहन करण्यात आले. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण निर्माण संवर्धनाची जागरूकता होईल आणि पर्यावरण संरक्षणासाठी जबाबदारीची भावना वाढेल, असा विश्वास विद्यालयाच्या प्राचार्यांनी व्यक्त केला. प्रा . अंकूश कुसनेनिवार , प्रा . रितेश चंदेल प्रा . बाळू आडे प्रा . समाधान हिंगाडे हितेश जाधव व महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी यांनी नियोजन केले होते या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
