
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
राळेगाव येथील शिवजयंती महोत्सव 2023 अंतर्गत शिवतीर्थ येथे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी खुली वक्तृत्व स्पर्धा गटात कु. संचिता सतिष हेटे हिला प्रथम क्रमांकाचे 5000/- रुपयाचे पारितोषिक व शिल्ड प्राप्त झाले तर शालेय वक्तृत्व स्पर्धा गटात कु अदिती अनिल वाट हिला प्रथम क्रमांकाचे 3000/- पारितोषिक व शिल्ड देण्यात आले तर कार्तिक सतिष नुन्नेवार यास पाचवे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. यासर्व विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांनी योग्य असे मार्गदर्शन केले असून . आज शाळेत वरील विजेत्यांचे मुख्याध्यापक प्रा. जितेंद्र जवादे, उपमुख्याध्यापक विजय कचरे,पर्यवेक्षक सुरेश कोवे, शिफ्ट इचार्ज अरुण कामनापुरे, व शाळेतील शिक्षकांनी अभिनंदन केले असून सदर वक्तृत्व स्पर्धेत विजेत्यां विध्यार्थ्यांवर राळेगाव शहरातुन अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
