बोराटी जंगलातील अवनी वाघिणीच्या हल्ल्यात प्राणज्योत मावळलेल्या 13 शेतकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

  

राळेगाव तालुक्यातील सराटी बोराटी, लोणी, खैरगाव कासार, वरध ,सावरखेडा या वनपरिक्षेत्रात पाच वर्षांपूर्वी अवनी वाघीनेने धुमाकूळ घालुन 13 नाहक शेतकरी शेतमजूर यांचा बळी घेतला या विदारक परिस्थितीत इथला बांधव जगत असताना अवनीT1 प्रोजेक्ट राबवुन या वाघिणीला जिवंत पकडण्यासाठी सेवा शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. यासाठी हैदराबाद येथील प्रख्यात शूटर व वन्य प्राणी अभ्यासक नवाझ शफाजत अल्ली व त्यांचा मुलगा अजगर अली यांनी या मिशनमध्ये सहभाग दर्शवून शेतकरी शेतमजूर बांधवांना वाघाच्या संरक्षणासाठी व आपल्या संरक्षणासाठी मार्गदर्शन केले व या शेतकऱ्यांना धीर देत असताना. 02 नोव्हेंबर 2018 रोजीला सराटी परिसरात या वाघिणीला ठार करण्यात आले. संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त होत असतानाच या परिक्षेत्रातील लोकांनी सुटकेचा श्वास घेतला आणि पूर्ववत शेतकरी शेतमजुरांचे व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढून जैसे परिस्थिती पूर्ववत झाली त्याचे औचित्त साधून . माजी शिक्षण मंत्री तथा आमदार मा.श्री वसंत दादा पुरके, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा श्री अरविंद भाऊ फुटाणे, सरपंच वेडसी अंकुश भाऊ मुनेश्वर व गावकरी यांच्या हस्ते सराटी या गावी कोणशिलेचे अनावरण दि 02 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात आले.
म्हणून आज रोजी दिनांक 2 नोव्हेंबर 2023 ला माझी शालेय शिक्षणमंत्री मा. श्री वसंत दादा पुरके, तालुका काँग्रेस कमिटी माझी तालुकाध्यक्ष मा श्री अरविंद भाऊ फुटाणे, अंकुश भाऊ मुनेश्वर, रमेशभाऊ लडे,दिगांभरभाऊ तडस, गणेश भाऊ धादे, धनराज भाऊ लाकडे, राजूभाऊ मेश्राम, सरपंच सराटी , गजानन प्रभाकर भोंगाडे काँग्रेस कमिटी कार्यकर्ता सामाजिक, शिलाताई विकास मेश्राम, नितीनभाऊ मारुती मेश्राम, निखिल सुरेश उईके,कवडु रामदास कोवे, प्रल्हाद उईके, भास्कर मेश्राम,शकर राऊत,शेखर राऊत,अतूल राऊत, धानोरकर,विजु शिवनकर, उरकुंडा खैरे, निळकंठ खैरे, रवि बोटुने, अनिल पधरे, मारोती दुरटकर,दुज्या पवार, सुभाष घोसले, अरविंद पवार, अंकुश भोसले,सरन भोसले,अनुबाई पवार, उमेश पवार, कीर्ती पवार, संतोष आडे,साजन कुडमते, निलेश पवार, रामभाऊ मोवाडे,मनोज विल्लारी,व ज्या तेरा लोकांना अवनी वाघिणीने गतप्राण केले त्यांचे नातेवाईक ,आप्त स्वकीय यांच्या उपस्थितीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली व आठवणीला उजाळा देऊन हा कार्यक्रम करण्यात आला आणि त्यांच्या विविध समस्या जाणून घेत पुरके सरांनी मार्गदर्शन केले.