
सहसंपादक : रामभाऊ भोयर
आज दिनांक १४/२/२०२६ रोजी “सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघा”चे केंद्रीय अध्यक्ष तथा माननीय थडाकेबाज आमदार श्री. गोपीचंदजी पडळकर साहेब, माजी मंत्री तथा आमदार अणि सेवा शक्ती संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष मा. श्री. सदाभाऊ खोत साहेब सेवा शक्ती संघाला एक कणखर नेतृत्व लाभलेले सामान्य कार्यकर्ता ते सरचिटणीस श्री. सतिश दादा मेटकरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत यवतमाळ विभागातील राळेगाव आगारा ची सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाची सर्वसाधारण सभा व आगार कार्यकारिणी निवड आज दिनांक १४/०२/२०२६ रोजी शिवाजी महाराज उद्यान, राळेगाव येथे यवतमाळ जिल्ह्याचे भा.ज.पा. जिल्हा अध्यक्ष मा.श्री. ॲडव्हकेट प्रफुल्लभाऊ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. कुणाल भाऊ भोयर (तालुक्का उपाध्यक्ष भा.ज.पा.) मा. श्री. अभिजीत भाऊ कदम तसेच सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ यवतमाळ विभागीय सचिव श्री. सचिन गिरी व विभागीय कार्याध्यक्ष श्री. कुणालभाऊ चौधरी व संदीप भाऊ पेंदोर उपस्थित होते… आगारातील पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थितीत होते,या सर्वांच्या उपस्थितीत राळेगाव आगाराची कार्यकारीणीची मोठ्या उत्साहात व कामगारांच्या प्रचंड उपस्थितीत सर्वानुमते व बिनविरोध खेळीमेळीच्या वातावरणात निवड करण्यात आली.
सर्वसाधारण सभा आटोपल्यानंतर विशेष वनभोजनाचे आयोजन राळेगाव आगारातील पदाधिकाऱ्यांनी केलेला होता त्याचा आस्वाद घेतल्यानंतर राळेगाव आगार व्यवस्थापक श्री. बोकडे साहेब यांना भेटुन विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली व त्यानंतर आमचे सहकार्य आपल्या पदाधिकारी व सभासदांना निश्चीतच राहिलं असे आश्वासीत केले.
या बैठकीत प्रफुल्ल भाऊ चव्हाण यांनी मार्गदर्शन करत नवनियुक्त पदाधिकारी यांचे स्वागत करत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. विभागीय सचिव श्री. सचिन गिरी यांनी युनियन बद्दल ची वाटचाल व विभागातील आपल्या सभासदांची प्रत्येक समस्या सोडल्या जाईल याबाबत आश्विसीत केले. विभा. कार्याध्यक्ष श्री. कुणाल भाऊ चौधरी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप भाऊ पेंदोर (विभागीय कार्याध्यक्ष) यांनी केले. राळेगाव आगारातून विभागीय कार्यकारिणी महिला प्रतिनिधी म्हणून सौ. तिलोत्तमा ताई कोरे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी राळेगाव आगारातील संघाचे सभासद मदन पिडेकर, अशोक आखरे, जनार्दन नेहारे , शंकर कोहळे, राजुभाऊ डंभारे, अमर जुनघरे, पद्माकर उपरीकर, राजु राठोड , वशीम खान, सुनील मेश्राम, संजयभाऊ किंनाके, गजुभाऊ किंनाके, गजानन मोरे, जगदीश भिसे, किसन मडावी, नंदू खांदरे, पंकज रोहनखेडे , संदीप पेंडोर सुरेशराव पेंडोर, आकाश महाजन,
सतिशभाऊ डाखोरे, संध्याताई मेश्राम, तिलोत्तमा कोरे, संगीता आत्राम , मंगला पंडित, गणेश बावणे, हेमंत रेवते, श्री. राणे , गजानन शिरभाते, राजुभाऊ कोवे,
माजी चालक दिलीपराव केराम, गजानन जुडे ई. सभासद उपस्थित होते…
राळेगाव आगाराची नवनिर्वाचित कार्यकारीणी खालीलप्रमाणे
आगार अध्यक्ष
श्री. प्रमोदभाऊ केराम
आगार सचिव
श्री. श्रीराम भाऊ मेश्राम
आगार कार्याध्यक्ष
श्री. रामेश्वर भाऊ मेश्राम.
याप्रमाणे कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे, कार्यकारीणी तील सर्व पदाधिकारी व सभासद यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.*
*
