.

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
भारताचे माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दिनांक २१/०५/२०२६ रोज गुरूवारला सायंकाळी सहा वाजता नगरपंचायत कार्यालयाजवळील राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.त्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे, शहराध्यक्ष प्रदीप ठुणे, राळेगाव नगरपंचायतीचे अध्यक्ष रविंद्र शेराम, वसंत जिनिंगचे उपाध्यक्ष अंकुश रोहणकर, नगरसेवक मंगेश राऊत, मधूकर राजूरकर,बाळू धुमाळ , दिलीप दुधगिकर, खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावणसिंग वडते सर, अशोक काचोळे पाटील, लोकदूत तालुका प्रतिनिधी प्रकाश मेहता,लोकमत प्रतिनिधी अशोक पिंपरे सर, माजी नगरसेवक अफसर अली, लियाकत आली, शशांक केंढे मंगेश पिंपरे राजू नागतूरे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवर मंडळींनी फोटो पुजन करून दर्शन घेतले.
