
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
जिल्हा परिषद यवतमाळ येथे माध्यमिक शिक्षण विभागाचे नियमित शिक्षणाधिकारी म्हणून किशोर पागोरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल शुक्रवारला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यवतमाळ च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षणाधिकारी
कार्यालयात झालेल्या या सत्कार सोहळ्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष राजेश मदने,जिल्हा कार्यवाहक संतोष पवार, कोषाध्यक्ष सचिन देशपांडे,सहकार्यवाह सुधीर कानतोडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनोद चिरडे, मुख्याध्यापक केळापुरे सर, जिरापुरे सर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. (ता.प्र.)
