
.
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात दिनांक १ जुलै रोज बुधवारला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते बंजारा समाजाला दिशा देणारे स्व.वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि शासनाच्या आदेशानुसार परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.त्यांतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.केंढे , प्रमुख पाहुणे म्हणून वसंत जिनिंगचे उपाध्यक्ष अंकुश रोहणकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रदीप ठुणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुश मुनेश्वर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले संचालिका सौ राजश्री झोटींग मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाच्या मंचावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.लगेच कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष मिलिंद इंगोले यांनी करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करून स्व वसंतराव नाईक यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्यांतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रदीप ठुणे, अंकुश मुनेश्वर अंकुश रोहणकर यांनी वसंतराव नाईक यांच्या सखोल कार्यावर प्रकाश टाकून त्यांच्या कार्याची आठवण करून दिली. त्याच कार्यक्रमात शेतकऱ्यांना एक दिलासा मिळावा त्यांची हिंमत वाढावी वसंतराव नाईक शेतकऱ्यांना किती प्रेम करायचे यांचे स्मरण करून देण्यासाठी त्यांना चालना देण्यासाठी प्रयोगशील शेतकरी राजेंद्र झोटींग खडकी, श्यामकांत येणोरकर धानोरा,तेजस पाल झाडगाव, कपिल चौधरी सावरखेडा,अभय खडसे मंगी यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.त्यावेळी या कार्यक्रमाला डॉ.सुभाष केंढे, अंकुश रोहणकर, अंकुश मुनेश्वर, प्रदीप ठुणे, मिलिंद इंगोले, मारोतराव पाल,नंदकुमार गांधी,सौ राजश्री झोटींग, राजेंद्र झोटींग गजानन पाल, सचिन टोंग श्रावणसिंग वडते सर, अशोक काचोळे, रामुजी भोयर,विनोद माहुरे,कवडूजी कांबळे,अभय फाळके, बाळासाहेब दरणे, मधूकर राजूरकर, किशोर धामंदे, पंकज गावंडे,अफसर अली,विजय धुळे, अनिल देशमुख गणेश नेहारे, अभिजित मानकर, लियाकत अली, बादशाह काझी व्यवस्थापक संजय जुमडे लेखापाल गणेश हिवरकर सचिन बोरकर अवधूत शेराम रोशन शिवरकर गौरव आत्राम यांच्या सह अनेक मान्यवर आणि शेतकरी बंधू उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक श्रावणसिंग वडते सर यांनी केले तर आभार सचिन टोंग यांनी मानले.या छोटेखानी सत्काराच्या कार्यक्रमाने कुणीतरी शेतकऱ्यांची दखल घेत असल्याची चर्चा उपस्थित पाहुण्यामध्ये दिसून आली या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
