धक्कादायक: नगर परिषद जलतरण तलावच्या बाजुला कुजलेल्या अवस्थेत वयोवृद्ध पुरुषाचा मृतदेह आढळला


प्रतिनिधी ::यवतमाळ
प्रविण जोशी

सेवादास कॉलनी च्या बाजूला असलेले नगरपरिषद जलतरण तलावच्या बाजूला कुजलेल्या अवस्थेत दि .14 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता वृद्ध पुरुषाचे मृत्यूदेह आढळल्याची घटना उघडकीस आली आहे .
येथील स्थानिक गुलाबसिंग रुडे नगर उमरखेड येथील रहिवासी कृष्णा सवाई रुडे यांचे वडील सवाईराम वसराम रुडे वय 82 वर्ष मागील पंधरा दिवसापासून बेपत्ता असल्याने उमरखेड पोलीस स्टेशन येथे बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती . आज दि 14 मार्च रोजी येथील नगरपरिषद जलतरण तलावाच्या बाजूला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे .
सदर मृतदेह गुलाबसिंग रुडे नगर उमरखेड येथील रहीवासी सवाईराम वसराम रुडे वय 82 वर्ष अशी मुतदेहाची ओळख पटली असल्याचे त्यांचे चिरंजीव कृष्णा सवाईराम रुडे यांनी सांगितले आहे .
मागील पंधरा दिवसापासून मानसिक संतुलन ठीक नसल्याने घरून निघून गेल्याने नातेवाईकांनी सगळिकडे चौकशी अथवा शोध घेतला असता पोलीस स्टेशन उमरखेड येथे हरवल्याचे तक्रारही दिली होती.
त्यानंतर आज दिनांक 14 मार्च रोजी येथील जलतरण तलाव च्या बाजूला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने मृतदेहाची पाहणी व तपासणी करून श्वविच्छेदनासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले. पुढील तपास उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे, पोलीस उपनिरीक्षक सी एम चौधरी पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड करीत आहे.
मृतकाच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी व नातवंड असा परिवार आहे