पुन्हा वाघाने केली गाईची शिकार,एका आठवड्यात चौथी घटना

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वेडशी येथील शेतकरी यांची गाय शेतात चारण्यासाठी नेली असता तिच्यावर वाघाने हमला करुन जखमी केले तर दुसऱ्या दिवशी सराटी येथील शेतकरी यांच्या गाईवर हमला करुन तिला ठार केले . तिच शाई वाळते न वाळत तेजनी येथील शेतकऱ्याची गाय जंगलात गुराख्याने शुक्र वारी चारण्यासाठी गेले असता गाय हि घरी आलीच नाही मात्र कळपातील इतर गायी वापस आल्या त्या गाईचा शोध घेतला असता ती कुठेच आढळून आली नाही. मात्र सोमवार ला जंगलात ती गाय नाल्याच्या बाजूला मृतावस्थेत आढळून आले . 09/08/2023 रोजी शेतकरी प्रभाकर मारुती भोंगाडे रा. बोराटी यांच्या गाईला वाघाने गावाजवळील नाल्यालगत जंगलात ठार केले. सदर ही घटना सकाळी 9 सुमारास घडली. व या घटनेने बोराटी, आंजी, तेजनी येथील शेतकरी, शेतमजूर शेतात जान्यास घाबरत आहे. वनविभागाने या वाघाचा बंदोबस्त करावा अशी तिन्ही गावातील नागरिकांची मागणी आहे.