
उमरखेड:उमरखेड तालुक्यातील ईसापुर ते फुलसावंगी या ४ कि. मी अंतराच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या खराब रस्त्यामुळे वाहनधारकासह सर्वसामान्यांना या रस्त्याने प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावर खड्डे आहे की खड्यात रस्ता आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या अपघाताला निमंत्रण देणाऱ्या रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार असा सवाल नागरीक यांनी प्रशासनासमोर उपस्थित केला आहे. या रस्त्याने ईसापुर, पिंपळवाडी रामू नाईक तांडा नारळी, हा भाग ग्रामीण असुन गावात वास्तव्याला असलेले बहुदा शेतकरी असुन शेतकऱ्यांना शेती उपयोगी सामग्री,ये जा करण्यासाठी व शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी हा एकच मार्ग असल्याने या गावातील सामान्य जनतेचीच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांची देखील हेळसांड होत आहे.कारण या रस्तावर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य तयार होतो. अशात यातून मार्ग काढून जाणे म्हणजे तारेवरची कसरत आहे.व गावाचे विद्यार्थी फुलसावंगी, महागाव, काळी टेंभी, या ठिकाणी विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येत जात असतात. सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांना रोजच फुलसावंगी याव लागत तालुक्याच्या ठिकाणी विविध कामांसाठी ये जा करावे लागतात. रस्ते पूर्णतः खड्डेमय झाले असून पावसाळ्यात हे खड्डे पाण्याने तुडुंब भरलेले असतात,अश्यात अख्यात वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने अनेक अपघात या रस्त्यावर होत असल्याने उमरखेड महागाव विधानसभेचे कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी यांनी याची दखल घेऊन लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी गावातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच शाळा भरवल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाल्यामुळे उमरखेड तालुक्याचे नायब तहशिलदार पंदरे तलाठी राहुल भोजने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे इंजिनियर घोडके बिटरगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उप पोलीस निरीक्षक टिपूरणे पो.कॉ.जाधव अधिनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थ व विद्यार्थांना नादुरुस्त रस्त्यामुळे होत असलेल्या हेडसान लवकरच थांबऊ असे आश्वासन दिले.तदनंतर ग्रामस्थ व विद्यार्थांनी वाहतूक कोंडी खुली केली. सामान्या होत असलेला त्रासांना शासन व प्रसाशन याने लवकरात लवकर उपाय योजना करावी अशी ग्रामस्थांनी मागणी धरली आहे शासन व प्रसाशन या कामामध्ये दिरंगाई केल्यास संपूर्ण ग्रामस्थ उपोषण ला बसू असे बोलले जात आहे.
