धानोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे शिवजयंती महोत्सवानिमित्त १९ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.श्री.
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन धानोरा ग्रामवासी यांच्याकडून करण्यात येत आहे.
तर सकाळी ग्रा.प. धानोरा येथील सरपंच ,उपसरपंच ग्रा.पं. सर्व सदस्य , गावातील प्रतिष्टीत नागरिक तथा शाळेतील सर्व पदाधिकारी, व गावातील पुरुष, महिला व वयोवृद्ध नागरिक तसेच बालगोपाल आधी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत् विविध कार्यक्रम होणार आहे. सदर या कार्यक्रमाला
सकाळी ९ वाजता सुरुवात होणार आहे त्यानंतर शिवजन्मोत्सव भव्य अशी शोभायात्रा लेझीम पथका सह धानोरा येथील हनुमान मंदिरापासून सुरु होईल व नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कर्यक्रमाला सुरुवात होईल.
तसेच रात्री सायंकाळी ६ वाजता भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर जि. प.शाळा धानोरा व
शिवशक्ती युवा बहुुद्देशिय स्वंस्था ,धानोरा व ग्रामवासी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे सदर या कार्यक्रमाला धानोरासह परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान वरील आयोजकांनी केले आहे.