ईचोरा ते आष्टा रोडवर लेलँड पलटी होऊन अपघात

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

सविस्तर वृत्त असे की मागील अनेक वर्षापासून ईचोरा ते आष्टा हा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असून, प्रशासनाला ग्राम वासी यांनी अनेकदा निवेदने दिली, परंतु झोपलेल्या प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही, दिनांक 14/11/2022 रोजी रात्री 9.00 चे सुमारास वीटभट्टी चे कामासाठी कोळसा असलेला MH 40 y 2740 या क्रमांकाचा अशोक लेलँड हा मालवाहू ट्रक रस्ता व पुल व्यवस्थित नसल्यामुळे पलटी झाला, त्यात ड्रायव्हर हा जखमी झाला असून त्याला यवतमाळ येथे उपचारासाठी पाठविण्यात आले, या रस्त्याने शेतीच्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व बैलगाडी तसेच वाहनांचा दरवर्षी अपघात होत असून लोकप्रतिनिधी, व तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे,
या रस्त्यासाठी ईचोरा येथील युवा शेतकरी श्री, किरण गाडगे व पोलीस पाटील अमोल थूल सातत्याने प्रयत्न करीत आहे, व प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे,
तरी प्रशासन दखल घेत नसल्याची खंत या दोघांनी व्यक्त केली, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या काळात लोक प्रतिनिधींना याचा फटका बसू शकतो,
असा नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.