स्मॉल वंडर्स कॉन्वेंटच्या यश ठमके ची आंतरराष्ट्रीय भरारी.

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

स्मॉल वंडर्स हाईस्कूल आणि कला वाणिज्य विज्ञान विद्यालय वडकी चा विद्यार्थी यश विजय ठमके यांनी आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.आय.ए.सी. इंटरनेशनल आर्ट कम्युनिटी या संघटने द्वारा आयोजित ऑनलाइन चित्रकला स्पर्धेत यश विजय ठमके ने आपला सहभाग नोंदविला असून प्रथमच त्याच्या चित्राची निवड करण्यात आली . त्यासाठी आय.ए.सी. संघटनेव्दारे त्याला प्रशस्तिपत्र देवून गौरवण्यात आले आहे.या पूर्वी यशच्या चित्राचे प्रर्दशन पूणे आर्ट गॅलरी मध्ये झालेले आहे. आपल्या चित्रकलेचे बाळकडु त्याला आपल्या वडिलाकडून मिळाले.त्या सोबत शाळेतील तज्ञ चित्र कलेचे शिक्षक कासार सर,पांडे सर,यांनी वेळोवेळी मागदर्शन केले. शाळेतील प्राचार्य कु .मंजुशा दौ.सागर, यांच्या सहकार्य व मागदर्शना सोबतच शेख सर,मालखेडे सर, गवळी सर, अतुल भेदुरकर सर, स्नेहा गौरकार मॅडम,अस्मिता चौधरी मॅडम,शन्नो शेख मॅडम, विजय फुलाकर सर, अक्षय वानखेडे सर, अमित डाखोरे सर आदी शिक्षकांनी वेळोवेळी प्रोत्साहन व सहकार्य करून उत्साह वर्धन केले आहे. आदिवासी बहुल भागातील ग्रामीण विद्यार्थीची ही उंच भरारी ठरली असुन वडकी व आसपासच्या भागात त्याच्या अंतराष्ट्रीय सहभागासाठी शुभेच्छा व अभिनंदन करण्यात येत आहे.