
प्रतिनिधी: प्रवीण जोशी ,ढाणकी
माऊलींच्या संजीवन समाधी निमित्त ढाणकी शहरातील ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरात कीर्तन व ग्राम प्रदक्षिणेचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्ताने असंख्य भाविक जमले होते हनुमान मंदिर तोरणाने व विविध रंगाच्या लाइटिंग ने सजविले होते व केळीचे कंद बांधून मंदिराचा परिसर सजविला गेला होता. व या निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला होता. तत्पूर्वी ग्राम प्रदक्षिणा करण्यासाठी एक सुंदर मोटर गाडी सजवली गेली. व त्यावर माऊली ज्ञानेश्वरांचा पद्मासन स्थित असलेली प्रतिमा ठेवली गेली. व वारकऱ्यांनी विविध प्रकारचे भजन म्हणत ग्रामप्रदर्शना पूर्ण केली तदनंतर कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी माऊलींच्या अनेक बाबीवर कीर्तनकार श्री गोपाल महाराज वाशिम कर यांनी प्रकाश टाकला.
ते म्हणाले योगियाचा राजा व मराठीची जननी असणाऱ्या माऊलींनी वयाच्या 22 व्या वर्षी संजीवन समाधी घेणारे ज्ञानेश्वर महाराज हे एकमेव होय. यांनी एक गुरु एक शिष्य या परंपरेला छेद देत परमार्थ विस्तृत करत सर्वसामान्यांनाही अध्यात्माची गोडी निर्माण केली. व ज्ञान व भक्तीचा मार्ग सुकर केला त्यामुळे ते वारकरी परंपरेतील आद्य क्रांतिकारक संत ठरले नियमित चालत आलेल्या परंपरेला छेद देऊन मोठा बदल करणे हे खूप जीकीरीचे काम असते. त्याकाळी एक गुरु आणि एक शिष्य अशी एक प्रथा होती.
“आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा!
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य.
या संतवाचनाप्रमाणे ही परंपरा अशी सुरू राहिली असती तर आज सर्वसामान्य व्यक्तींना कीर्तन व प्रवचन श्रवण करायला मिळाले नसते. तसेच कीर्तन करण्यासाठी विशिष्ट अधिकार प्राप्त करावा लागला असता. समाज प्रबोधन करण्यासाठी व्यासपीठ मिळाले नसते. समाज मनावर तत्कालीन काळात संस्कार करणे खूप गरजेचे होते .कारण काळानुरूप बदल व्हावा पण तो वैचारिक असावा आणि हाच बदल ज्ञानेश्वर माऊलींनी निवृत्तीनाथांच्या आज्ञेने केला.
तसेच यावेळी गोपाल महाराज वाशिमकर यांच्या हृदयस्पर्शी कीर्तनाने संपूर्ण हनुमान मंदिराचा सभागृह भाऊक झाला होता. व भले मोठे असलेले हनुमान मंदिराचे सभामंडप भाविकांनी खचाखच भरले गेले होते. व हा सभागृह भाऊक झाला होता. माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यात कीर्तन करत असताना महाराजांच्या डोळ्यात अनेक वेळा अश्रूंचा बांध फुटला. यावेळी अनेक भाविकांच्या नेत्रकडा देखील पाणवल्या माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या प्रसंगावर भाविक भक्त मात्र भारावले होते.
