राळेगाव तालुक्यातील बळीराजा कडून वरूण राजाला हाक

   राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर 

राळेगाव तालुक्यातील बळीराजा हा आपली टोबनी, पेरणी करून आलेल्या वरून राज्याच्या भरवश्यावर खूप सुखावला होता , परंतु आता सध्या चिंताचुर असल्याने वरूण राजा कोपल्याचे दृश्य सध्या स्थितीत दिसून येत आहे, त्यामुळे आज रोजी राळेगाव शहरातील क्रांती चौक येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते,तसेच तालुक्यातील विविध गावात व शहरात वरून राजाला प्रसन्न करण्याकरिता विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करून वरून राजांनी बळीराजाला बरसून दाद द्यावी अशी मागणी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे, तालुक्यातील बळीराजानी आपल्या जवळ असलेले सर्व काही आपल्या शेतात पेरले परंतु निसर्ग हा शेतकऱ्यावर कोपल्याने “देवा आता तरी तारशिल का? ” अशी व्यवस्था तालुक्यातील जनतेची झाली आहे,या आशेने बळीराजा कडून वरूण राजाकडे साकडे घालीत आहे.