अँटी करप्शन च्या धाडीने झाले अवैध  रेती तस्करी वर शिक्कामोर्तब?

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

 तालुक्यातील अवैध  रेती तस्करी गाजत असतांना दहा ऑगस्ट रोजी राळेगाव पोलीस स्टेशन चे जमादार शालीक किसन लडके हे अवैध  रेती तस्करी संबंधात लाच घेतांना अँटी करप्शन च्या चमू ला रंगेहात सापडल्याने राळेगाव तालुक्यातील रेती घाटावरून होणाऱ्या रेती तस्करीवर शिक्का मोर्तब झाले असल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी महसूल प्रशासनाने अवैध रेती तस्कऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. 
आणि त्या नंतर या धाड नाट्याला सुरुवात झाली, मुख्य माणसाला आर्थिक लाभ पोहचत असतांना खालचा कर्मचारी वर्ग तंग करत असल्याने ही तक्रार झाल्याची चर्चा दबक्या आवाजात करताना रेती तस्करी करणारे करत आहेत.
      मी नाही तर कोणीच नाही या प्रकारातून पुन्हा रेती चोरी करणाऱ्या वर महसूल विभागाने कारवाई करून आम्हीही कमी नाही हा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे या घटने वरून दिसून येत आहे. 
खरा कळीचा मुद्दा असा आहे की शालीक किसन लडके नावाचा पोलीस अधिकारी राळेगाव येथे दाखल झाल्या नंतर आपल्या कार्यक्षेत्रा बाहेर जाऊन असामाजिक तत्व कामे करणाऱ्या कडून दहशतीचे वातावरण निर्माण करुन चुकीच्या पद्धतीने माया कमविण्याचे धोरण सुरु केल्याने हा अँटी करप्शन धाडीचा प्रकार घडल्याचे रेती चोरी करणारे सांगत असल्याचे दिसून येत आहे, दोषी जमादार नोकरी वर लागण्या पूर्वी यांची संपत्ती यांचा पगार आज यवतमाळ येथे असलेला आलिशान बंगला, रोज यवतमाळ टू राळेगाव येथे  आलीशान चार चाकी वाहनाने ये जा एक जमादार करु शकतो का?
या आधी राळेगांव पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत वाहतूक शिपाई सुध्दा ॲटी करप्शन च्या सापळ्यात अडकला.
होता. 
 अशा विविध प्रकारच्या चर्चा राळेगाव तालुक्यातील सामान्य नागरिक करताना दिसत आहे.