जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकलारा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

राळेगांव तालुक्यातील एकलारा येथील जि. प. प्राथमीक शाळेत स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी जि.प.शाळेतील माजी विद्यार्थी जवान श्री. गजानन चौधरी यांच्या हस्ते झेंडावंदन करुन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. गणेश मुके व शाळा व्यवस्थापन समितीने एक स्तुत्य उपक्रम राबवीला . या पुर्वी जि.प. शाळा मध्ये व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचे हस्ते ध्वजारोहन व्हायचे परंतु यावेळी एकलारा जि.प. प्राथमीक शाळेचे शाला व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. गणेश मुके यापुढे जि.प. प्राथमीक शाळेमधुन शिकुन गेलेले विद्यार्थी विर जवान श्री. गजानन चौधरी यांचे हस्ते ध्वजारोहण करायचे असा ठराव घेतला . त्या नुसार या वर्षीचा 15 ऑगस्ट ला झेंडावंदन जि.प. शाळेमध्ये विर जवान श्री. गजानन चौधरी यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले . विर जवानाच्या हस्ते झेंडावंदन झाल्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. झेंडावंदन च्या अगोदर प्रभात फेरी , नंतर शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांची भाषणे घेण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित जि. प. प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. पुडके सर , सहशिक्षक मा.श्री. भोसे सर , शाला व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. गणेश मुके , विर जवान श्री. गजानन चौधरी , अंगणवाडी सेवीका सौ. रुपालीताई गजानन आत्राम, पोलीस पाटील श्री. प्रल्हादभाऊ आत्राम , उपसरपंच सौ. ललीताताई ससाणे, गुरुदेव समिती सदस्य श्री. सुधीरभाऊ चौधरी , श्री. राजुभाऊ ससाणे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गण व तसेच एकलारा ग्रामवासी कार्यक्रमाला उपस्थित होते.