राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे राळेगाव तालुकाध्यक्षपदी दिलीप कन्नाके

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची आढावा बैठकीत यवतमाळ जिल्हा, राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमेटीच्या दिलीप कन्नाके तालुकाअध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा निरीक्षक अफजल फारुख, अमरावती विभागीय अध्यक्ष डॉ. प्रा. सुरेखा देशमुख, जिल्हाध्यक्ष
वर्षा निकम, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आशीष देशमुख, राजेंद्र उत्तमराव पाटील,सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आर्णी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल कानारकर, आर्णी तालुकाध्यक्ष सुनील पोतगंटवारसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दिलीप कन्नाके हे सामाजिक कार्यात सदैव तत्पर राहत असून त्यांच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक जनहिताची कामे केली आहेत. तालुक्यामध्ये राष्ट्रवादी संघटनेचे मेळाव्याचे नियोजन करून यशस्वी केले. युवक मंडळीनां मार्गदर्शन, सामाजिक कार्यात भर पडली आहेत. त्यांच्या नियुक्तीचे सर्वत्र राळेगाव तालुकातुन कौतुक होत आहे.