
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम
पोंभूर्णा तालुक्यातील जि. प. उच्च प्राथ.शाळा बोर्डा बोरकर येथील शिक्षकवृंद आणि शालेय विद्यार्थी यांनी प्रभातफेरीच्या माध्यमातून गावात मेरी मिट्टी मेरा देश…मिट्टी को नमन विरो को वंदन संदर्भात जनजागृती करन्यात आली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या सुचनेनुसार
मेरी मिटटी मेरा देश
मिटटी को नमन वीरों को वंदनअभियान अंतर्गत दिनांक 7/8/23 ते 12/8/23 पर्यंत, वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा, स्लोगन स्पर्धा,पंचप्राण शप्पथ ,चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली
तसेच हर घर झंडा ,शहिद जवान यांच्या बद्दल लोकांमध्ये देशाभिमान असावा आदर असावा ,जाणिव जागृती करीता माती कलश घेऊन गावातून प्रभातफेरी काढण्यात आली… गावातील नागरीकांनीही या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतीसाद दिला असून यावेळेस शाळेच्या मुख्याध्यापिका पिंपळकर मॅडम, पेंदोर सर, जुमनाके सर, बावने सर, ग्राम पंचायत शिपाई रविंद्र भट, उमेश सिडाम विद्यार्थी प्रामूख्याने उपस्थीत होते