
सहसंपादक : रामभाऊ भोयर
भारतीय जनता युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीची घोषणा दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी यवतमाळ येथे करण्यात आली. ही घोषणा राज्याचे आदीवासी मंत्री राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार प्रा डॉ अशोकराव उईके सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष श्री. प्रफुल्ल भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या नव्या कार्यकारिणीत श्री. निलय घिनमीने यांची जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. गेल्या पंधरा वर्षांपासून श्री. निलय घिनमीने हे भारतीय जनता युवा मोर्चात विविध स्तरावर सक्रिय राहून काम करत आहेत. कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवून संघटन वाढविणे, युवकांमध्ये पक्षाची विचारधारा पोहोचविणे, तसेच सामाजिक आणि राजकीय उपक्रमांमध्ये अग्रेसर राहून योगदान देणे यामध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. मागील कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय ठरले होते. संघटन मजबूत करण्यासाठी त्यांचे नेतृत्व, नियोजनशक्ती आणि संघटन कौशल्य यांचा उपयोग पक्षाला सातत्याने होत आला आहे.
त्यांच्या या यशस्वी कारकीर्दीची दखल घेऊन जिल्हा अध्यक्ष सुरज गुप्ता यांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली आहे.
पक्ष संघटनेत त्यांच्या सोबतच राळेगाव तालुक्यातील सौरभ पवार यांना जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन शेंडे आणि चारुदत्त पाटील यांना जिल्हा सचिव सचिन पारिसे, सागर कोल्हे, चंदन जाधव, नितीन झाडे यांना जिल्हा सदस्य म्हणून जबाबदारी देण्यात आली
जिल्हा पदावर नियुक्ती मिळाल्यानंतर निलय घिनमीने आणि बाकी सदस्यांनी आदिवासी मंत्री प्रा डॉ अशोकराव उइके सर, जिल्हाध्यक्ष ऍड प्रफुल्ल चव्हाण, तालुकाध्यक्ष छयताई पिंपरे तसेच पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी यांचे आभार मानले असून, पक्षाच्या धोरणे कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि युवा कार्यकर्त्यांचे भक्कम संघटन उभारण्यासाठी अथक परिश्रम घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्यातील विविध स्तरांवरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक युवा कार्यकर्त्यांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करत आगामी काळात व्यक्त केला आहे.
