स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काळाने घातला घाला ,आंघोळी साठी नदीवर गेलेल्या दोघांचा नदीत बुडून मृत्यु

सहसंपादक : रामभाऊ भोयर

15 ऑगस्ट 2024 रोजी पी ओ पी चे काम करणारे वर्ध्यातील सात तरुण युवक धाम नदी तीरी फिरण्या करीता आले असता तीन युवक धाम नदीत आंघोळी करीता नदीत उतरले त्या पैकी एक युवक नदीतून सुखरूप बाहेर काढण्यास तेथील उपस्थित असलेल्या नागरिकांना यश आले तर जुमायु उर्फ उजहाईल हक नदीतून बाहेर आला मात्र आपला मित्र नसीम खान राजु खान हा पाण्यात बुडत असल्याचे पाहून जूमायु याने मित्रास वाचविन्यासाठी धाम नदीतील पालखी डोह या ठिकाणी उडी घेत वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तो हि नदीत बुडून मरण पावल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली घटनेची तत्काळ माहिती सेवाग्राम पोलिसांना देण्यात आली असता सेवाग्राम पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक विनीत घागे यांच्या सूचनेनुसार गावातील स्विमर अर्जुन बावणे दीपक बावणे विजय पाटील यांनी पाण्यात बुडून असलेल्या नसीम खान याची दीर्घ प्रतिक्षे नंतर बॉडी बाहेर काढण्यास यश आले तर जुमायू उर्फ उजहाईल हक याची बॉडी उशिरा पर्यंत शोध घेतला असता मिळाली नाही दिनांक 16 ऑगस्ट रोजी सकाळी फिरावयास आलेल्या होमगार्ड सैनिक विकास गायकवाड यांना दिसताच सेवाग्राम पोलिसांना माहिती देण्यात आली असता तत्काळ सेवाग्राम पोलीस स्टेशनचे पी एस आय कदम व पोलीस हवालदार गजानन कठाने यांनी घटना स्थळ गाठत होमगार्ड सैनिक विकास गायकवाड व अर्जुन बावणे यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून घटनेचा पंचनामा करून मृतदेह उतरिय तपासणी करीता सेवाग्राम रुग्णालय इथे पाठविण्यात आला असून अधिक तपास सेवाग्राम पोलीस करीत आहे

प्रतिक्रिया 

दोघेही उतर प्रदेश इथल्या बलरामपूर जिह्यातील असून नसीम खान हा वय 21 वर्ष हा रा पुनापुर गावचा आहे तर जूमायु खान हा तुलसिपुर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे दोघेही पी ओ पी चे काम करण्या करीता इथे आले होते सद्याचे वास्तव्य आर्वी नाका गजानन नगर इथे किरायाने वास्तव्यास होते


साबीर खान वर्धा
पी ओ पी
कंत्राटदार