राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या विदर्भ विभागीय अध्यक्षपदी रोशन कुंभलकर यांची निवड.


मागील अनेक वर्षांपासन राष्ट्रीय ओबीसी महासंघ सातत्याने ओबीसी विषयी लढा देत आहे. महासंघाचा विस्तार फक्त महाराष्ट्राचं नव्हे तर देशात होत आहे. त्याच प्रमाणे राष्ट्रीय ओबीसी महासंघ आपल्या विदर्भात पण पकड मजबूत करीत आहे, ओबीसी महासंघाचा प्रामाणिक लढा बघून अनेक लोक महासंघाला जुडण्यास उत्सुक आहे.
त्याच प्रमाणे राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ विदर्भ विभागीय अध्यक्ष पदी रोशन सु. कुंभालकर यांची नियुक्ती केली आहे, ही नियुक्ती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे सर यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली.
दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रवक्ते ऋषभ राऊत, राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे वर्धा जिल्हाध्यक्ष रोहित हरणे, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ वर्धा जिल्हाध्यक्ष अक्षय इंगोले, दिनेश काटकर, युवराज माऊस्कर, शैलेश मैंद,विशाल असुटकर, शुभम वाढई, सौरभ हिवसे, पियूष ठाकरे, अथर्व भोयर आदींनी शुभेच्छा दिल्या .