
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ
गेल्या चार ते पाच दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे शेतातील अंतर मशागतीची कामे खोळंबली होती पण आज रोजी पावसाने उघडी दिली त्या कारणाने शेतातील मशागतीला शेतकरी जोमाने लागला असताना माहूर तालुक्यात एका चवताळलेल्या रानडुकराने धिंगाणा घातला व अचानक या रानडुकराच्या झालेल्या हल्ल्यामध्ये एका महिलेला आपला जीव गमवावा लागला तर बंजारा तांडा येथील पुरुष जखमी होऊन रक्तबंबाळ झाल्याची खळबळजनक घटना २३ जुलै रोजी घडली.
आज दिनांक 23 जुलै रविवारला अंदाजे सकाळी दहा वाजताच्या सुमारास लक्ष्मीबाई राजेंद्रनाथ लाखे वय वर्ष ५२ या आपल्या गावकरीच असलेल्या मळ्यामध्ये काम करत होत्या अचानक आकाराने मोठे व धष्टपुष्ट असलेल्या रानडुकराने येऊन त्यांना जोरदार धडक मारून खाली पाडले त्यांच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या त्यावेळी असलेले अवसान एकत्र करून त्यांनी आरडाओरोड केली असता शेजारी असलेले शेतकरी धाऊन आले व रानडुकराला परतून लावले पण झालेल्या जखमा गंभीर होत्या तशाच अवस्थेत त्यांना माहूर येथील रुग्णालयात दाखल केले व तेथे उपस्थित असलेले डॉ. अवधूत गोदमले डॉ. मंगरळकर, आधीपरिचारिका एम. एस. कनाके, श्रीमती अमृता कराळे यांनी उपचार केले व अति गंभीर अवस्थेतील महिलेस पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रवाना केले दरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर दुसरी घटना बंजारा तांडा येथे वास्तव्य असलेले राजु मोहन पवार वय वर्षे चाळीस हे शेतात दैनंदिन काम करत असताना रानडुकराने पाठीमागून प्रचंड मोठ्या प्रमाणात हल्ला केला व हाताला मांडीला चावा घेऊन जखमी केले व हल्ला आणि आरडाओरडा केल्यानंतर जमाव जमला व तिथून हल्ला करणारे डुक्कर पळून गेले त्यामुळे मोठ्या प्रमाणात जखमी असलेल्या राजू यांना माहूर येथील रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठवले आहे.
