एम .पी .डी.ए. मधील फरार आरोपी यास इस्लामपूर येथे अटक

. प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ


एम.पि. डी. ए.मधील फरार आरोपी रघुनाथ दत्ता माणिकवाड वय २५ वर्ष रा. करंजी तालुका उमरखेड ह्यास इस्लापूर जी. नांदेड येथे अटक करण्यात आली. दि.२९/०८/२०२३ ला मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांचे कडे एम.पि. डी. ए चा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सदर प्रस्ताव मंजूर झाला असून आरोपीस इस्लापूर जिल्हा नांदेड येथे अटक करण्यात आली आहे.व आरोपीस जिल्हा कारागृह यवतमाळ येथे दाखल करण्यात आले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ पवन बनसोड , मा. अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप , मा. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी, यांच्या मार्गदर्शनाखाली बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुजाता बनसोड, सोबत पो.उपनिरीक्षक शिवाजी टीपूर्णे ,एन पि सी मोहन चाटे, पो कॉ.निलेश भालेराव पो.स्टेशन बिटरगाव ने केली आहे.