सर्वोदय विद्यालयात वर्ग 10च्या विद्यार्थांना निरोप तथा पालक सभा संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

राळेगाव प. स. अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथे वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक श्री टी. झेड. माथनकर हे होते. सूत्रसंचलन संस्कृती गाउत्रे हिने तर आभाप्रदर्शन अंजली कोटरगे हिने केले. उपस्थित विद्यार्थ्यांची भाषणे झाली. विद्यार्थ्यांनी भेट दिलेल्या फोटो चे पूजन केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले. नंतर स्नेहभोजन देण्यात आले. त्यानंतर झालेल्या पालक सभेचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक श्री टी. झेड. माथनकर हे होते. मुख्य विषय होता कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा देणे.या विषयावर व्हीं. एन. लोडे यांनी प्रास्ताविक केले. काही पालकांनी शंका व प्रतिक्रया दिल्या. त्यांचे समाधान करण्यात आले. श्री पि. पि. आसुटकर, आर. एस. वाघमारे, सी. डब्लू. मोडक यांनी आपल्या विषयानुरूप मार्गदर्शन केले. श्री माथनकर सर यांनी बोर्ड परीक्षेत शाळेतून पहिला येणाऱ्यास स्वातंत्रदिनाच्या दिवशी ध्वजरोहनाचा मान मिळेल असे जाहीर केले. बी.बी. कामडी, वी.टी. दुमोरे, एस. एम. बावणे, एस. व्हाय. भोयर यांनी सहकार्य केले.