सर्वोदय विद्यालयात सामुहिक रक्षाबंधन तथा वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम साजरा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव प. स. अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथे बंधुभाव निर्माण उद्देशाने सामुहिक रक्षाबंधन घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मु. अ. श्री टी. झेड. माथनकर हे होते. संचालन आर. एस. वाघमारे यांनी केले. सर्व मुलींनी कर्मचारी तथा विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या. त्यानंतर हरितसेना प्रभारी व्हि.एन. लोडे यांच्या पुढाकाराने परिसरातील वृक्षांना राख्या बांधल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक श्री पि. पि. आसुटकर तथा बी. बी. कामडी, वी. टी. दुमोरे, एस. एम. बावणे, एस. वाय. भोयर यांनी परिश्रम घेतले.