फूलसांवगी येथील विज वितरण कंपनीचा हम करे सो कायदा,शेतकरी व पत्रकार बंधूंची धडक

यवतमाळ प्रतीनीधी:- संजय जाधव

माहागाव तालुक्यात सर्वात मोठी विजेची समस्या आहे पण त्याकडे कोणी लक्ष देत नाही. शेतकरी गहू हरभरा भाजीपाला ऊस केळी इतर पिके घेण्यासाठी धावपळ शेतकरी करीत आहे. रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी कर्ज घेतले तर काहीनी सावकारी कर्ज घेतले पण विज पाहीजे पण विजेअभावी रब्बी हंगाम धोक्यात येत आहे कारण विज वारवार खंडीत होते खंडीतमुळे पिकाना धोका उदभवतो. विजेचा प्रश्न गंभीर आहे विजवितरण कंपनीचा ताळमेळ नाही आहे

याकडे लोकप्रतिनिधी सुद्धा लक्ष देत नाही तालुक्यात विज रोहीत्र निकामी झाले. शहरी व ग्रामिण भागात विजेचा प्रश्न गंभीर आहे शेतकरी संकटात आहे रब्बी हंगामाला पाणी पाहीजे पाणी पिकांना वेळेवर जर मिळाले तर हंगाम चांगला येईल नसता धोक्याची घंटा हंगामाला बाजू शकते पण
कोणाचा कोणाला मेळ नाही. रब्बी हंगामाला विज वेळेवर पाहीजे तरच सिंचन होईल पण विज दोन तीन दिवस खंडीत राहते अश्या मनमानी कारभारामुळे नागरीक त्रस्त झाले. लाखो रुपयांचे बियाणे खरेदी करून पेरणी केली पण विज वारंवार गायब होते अश्या वेळी शेतकरी चिंतेत आहे दिवसभर कडक उन्ह रात्रीला थंडी असा उपद्रवी प्रकार आहे पण यावर शासनाने कोणताही तोडगा काढला नसल्यामुळे विज वारंवार खंडीत होते रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यतानारळी कोर्टा फिटर व निघणार फिटर येथील शेकडो नागरिकांनी आज फुलसावगी येथील वीज केंद्रावर धडक दिली होती यावेळी 200 च्या जवळपास कास्तकार फुलसावंगी पत्रकार संघाचेअध्यक्ष शैली जी वानखेडे व दिव्य मराठीचे प्रतिनिधी तसलीम शेख यांनी काम चुकार कर्मचाऱ्यांना चांगले धारेवर धरले
.