
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
अशोकभाऊ मेश्राम वरीष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी बारावी मध्ये ७५ % गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले अश्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला, तसेच ग्रामीण भागातील काम करणाऱ्या आशा सेविका,व आशा परिवेक्षिका यांच्या साडी देऊन सत्कार करण्यात आला एवढंच नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिकांना शहराच्या ठिकाणी रुग्णांना नेण्यास तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होऊन रुग्नाला तातडीने उपचार मिळावेत यासाठी त्या रुग्णवाहिकाचे अनावरण केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबाराव महाजन, प्रमुख पाहुणे म्हणून सुधीरपाटील जवादे , सत्कारमूर्ती अशोक मेश्राम वरीष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी परीसरात सर्व पक्षीय पदाधिकारी व आशासेविका आशा परीवेक्षिका तसेच मोठ्या प्रमाणात युवक वर्ग उपस्थित होते.
