राळेगाव येथे युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

सहसंपादक: रामभाऊ भोयर

यवतमाळ दिनांक ९ फेब्रुवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव येथे इंडीयन अलायन्स पार्टी चे पदाधिकारी, प्रफुल्लभाऊ मानकर अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी यवतमाळ, वसंतराव पुरके माजी शिक्षणमंत्री म.रा विनोद काकडे राळेगाव तालुका प्रमुख शिवसेना, मिलिंद इंगोले अध्यक्ष ख.वि .संघ राळेगाव, नंदकुमार गांधी अध्यक्ष वसंत जिनिंग प्रेसिंग राळेगाव, सुरेश पेंद्राम, राजेंद्र ओंकार, धवल घुगरुड अध्यक्ष राळेगाव तालुका युवक काँग्रेस यांच्या उपस्थितीत राजेंद्र तेलंगे यांची राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी च्या अध्यक्षपदी निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आले, विनोद माहुरे यांची राळेगाव तालुका काँग्रेस सोशल मीडिया प्रमुखपदी नेमणूक करुन नियुक्तीपत्र देण्यात आले.तर सनी छोरीया यांची राळेगाव शहर युवक काँग्रेस च्या प्रमुखपदी नेमणूक करून नियुक्तपत्र देण्यात आले तसेच राळेगाव शहरातील तसेच राळेगाव तालुक्यातील असंख्य युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केले .याव राळेगाव तालुक्यातील इंडीयन अलायन्स व काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.