दारुच्या नशेत पोलीस कर्मचाऱ्याची वंचितच्या जिल्हा उपाध्यक्षाला धमकी

वणी : नितेश ताजणे

येथिल पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने दारूच्या नसेत धमकी दिल्याची तक्रार वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग यांनी एसडीपीओ यांचेकडे तक्रार केली असून कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सध्याच्या काळात वणी ठाण्यात काही पोलीस कर्मचारी दारू ढोसुन आपले “मनमानी” कर्तव्य बजावत अरेरावीची भाषा वापरून जनतेत भितीचे वातावरण निर्माण करून “पोलीस काका”बद्दल ची आपुलकीची भावना दुरावत चालली असतांनाच आता चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याने वंचितच्या जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग यांना अरेरावीची भाषा वापरून मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
शहरातील राजू लोहकरे हे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. प्रसंगी त्यांनी वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग यांना बोलावले होते. दरम्यान डायरीवर बसलेले पोलिस कर्मचारी धीरज चव्हाण यांना याबाबत विचारणा करीत असतांना धीरज चव्हाण यांनी अरेरावी भाष्य करीत “तु कोन आहेत? “तू वणीत कसा टिकतो” तुला तर झापड मारणार होतो, अशा प्रकारे अब्रुचे धिंडवडे काढत धमकी दिली असल्याची तक्रार वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग यांनी एसडीपीओ यांना दिलेल्या निवेदनातून करीत संबंधित कर्तव्यावर दारू ढोसून असलेल्या धीरज चव्हाण विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा ही निवेदनातून दिला आहे. आता त्या पोलिस कर्मचाऱ्यावर काय कारवाई होणार? याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.