

सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव पासून अवघ्या तीन किलोमीटर वर वसलेले देशातील एकमेव सीता मंदिर या गावात व बांधलेल्या अवस्थेतील हनुमान मंदिर असल्याने रावेरी गावातील ग्राम दैवत असलेल्या ठिकानी श्री हनुमान मंदीरात राम जन्मापासून भागवत सप्ताह सुरू होतो आणि नेहमी भोजन असते,चिरंजीवांपैकी एक असलेले बाल ऊपासक अशी ख्याती प्राप्त श्री हनुमंतराय यांचा जन्मउत्सव अगदी उल्हासात व आनंदाने साजरा करण्यात आला, सकाळी हनुमान जन्म साजरा करून प्रसादाचे वितरण करून गावात दिंडी काढण्यात आली असून यावेळी श्री हनुमंतरायांची मूर्ती विलोभनीय दिसत होती अनेकांना नवसाला पावणारे श्री हनुमंतराय अशी ख्याती असलेल्या रावेरी येथील मूर्तीला केलेली मनोकामना पूर्ण होतात अशी भक्तांची श्रद्धा रावेरी येथील श्री हनुमंतरायांची मंदिराची कीर्ती आहे, तालुक्यांतीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र मधून हनुमान जयंतीला भक्त गण उपस्थित राहत असतो त्या निमित्याने रावेरी गावात सर्व ठिकाणी बॅनर लावून व गावाची सर्व प्रमुख रस्ते साफ करण्यात येते व दुपारी 12 वाजे पासून तर भक्त गणाच्या आगमनापर्यंत महाप्रसादाचे वितरण करण्यात येत या वेळी मदिर कमिटीचे सर्व पदाधिकारी व गावातील सर्व मान्यवर युवक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य करण्यात सहभाग असतो.
