
सहसंपादक : रामभाऊ भोयर
सोमवारला राळेगाव शहरांमध्ये गारा वादळ वाऱ्यासह अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा कापूस तूर हरभरा गहू व इतरही पिकांचे अतोनात नुकसान झाले या पिकांचा सर्वे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करावी सोबतच नियमित कर्जदारांना सुद्धा कर्जमाफी द्यावी अशा आशयाचे निवेजन राळेगाव ग्राविकाच्या वतीने तहसीलदार अमित भोईटे तसेच सहायक निबंधक यांना देण्यात आले
शासनाने मागे घोषणा केल्यानुसार कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली आहे पण प्रत्येक कर्जमाफीमध्ये थकीत कर्जदारांनाच कर्जमाफी केली जाते व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवरती अन्याय होतो त्यामुळे या कर्जमाफीमध्ये थकीत कर्जदाराप्रमाणेच नियमित कर्जदार शेतकऱ्यांचे सुद्धा कर्ज माफ करावे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आजतागायत कुठलीही कर्जमाफी मिळाली नाही मागील कर्जमाफीमध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ 50000 रुपयाचे प्रोत्साहन पर अनुदान मिळाले पण त्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली नाही आम्ही नियमित कर्ज भरतो म्हणजे आम्ही गुन्हा करतो का? अशी भावना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे ज्याप्रमाणे थकीत कर्जदारांना कर्जमाफी होते थकीत कर्जदारांचा सातबारा कोरा होतो तशाच पद्धतीचा सातबारा कोरा तशाच पद्धतीची कर्जमाफी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा मिळावी थातूरमातूर प्रोत्साहन पर अनुदान देऊन त्यांची बोळवण केली गेल्यास भविष्यात कुठलाही शेतकरी कर्ज भरणार नाही त्यामुळे या कर्जमाफीमध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा थकीत कर्जदारासारखीच वागणूक मिळावी व त्यांचे सुद्धा सर्व कर्ज माफ व्हावे सरकारने सुद्धा कर्जमाफीची घोषणा करताना असे म्हटले होते की 30 जून 2026 ला यासाठीच आम्ही कर्जमाफी देत आहोत की 31 मार्च 2026 ला शेतकरी कर्ज भरणार नाहीत ते थकीत होतील व त्यांना आपण कर्जमाफी देऊ त्यामुळे यावेळेस आश्वासन दिल्यानुसार सरसकट सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी निवेदनाद्वारे राळेगाव ग्राविकाच्या वतीने करण्यात आली आहे निवेदन देताना ग्राविकाचे अध्यक्ष सचिन हूरकुंडे उपाध्यक्ष राजेश काळे संचालक जानराव गिरी तातेश्वर पिसे विनोद नरड कृष्णराव राऊळकर विनायक नगराळे अशोक पिंपरे प्रभाकर राऊत गजानन पाल गजानन महाजन प्रकाश मेहता लियाकत सय्यद रामाजी कुळसंगे संजय दांडेकर आदी शेतकरी उपस्थित होते
