सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वाढोणा बाजार येथील जिल्हा परिषद शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीची पालकांमधून निवड करण्यात आली आहे. सदर या निवडीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून विनोद नथुजी येरणे तर उपाध्यक्ष म्हणून प्रतिभा निलेश पराते यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तर समितीमधील सदस्य म्हणून रवींद्र माहुरे, राजू कन्नाके, निलेश किन्नाके, हनुमान कुडमते, योगेश पडाल, यास्मिन शेख, सौ चाहारे ताई, सौ कोडापे ताई, सौ तुराळे ताई, सौ सविता कोटरंगे यांची या समितीमध्ये निवड करण्यात आली आहे.