संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना ढाणकी शहर कडकडीत बंद


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी


परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीच्या झालेल्या विटंबना प्रकरणी परभणी येथील आंबेडकर अनुयायांच्या वतीने निषेध नोंदवत असताना पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्यात पस्तीस वर्षीय तरुणांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला त्या निषेधार्थ संविधान प्रेमींनी १७ मंगळवार रोजी ढाणकी शहर बंदचे आव्हान केले होते त्यास प्रतिसाद देत ढाणकी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग नोंदवल्याने शहर कडकडीत बंद होते.

ढाणकी शहरातील जुने बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला व क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व विविध बाबासाहेबांच्या विचार मानणाऱ्या व संविधान प्रेमींनी आणि संघटनांनी कार्यकर्त्यांनी एकत्रित येत परभणी येथील घटनेचा निषेध नोंदविला परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ संविधान प्रेमींनी १७ मंगळवार रोजी मंगळवारी बंदचे आवाहन केले होते. त्याला ढाणकी शहरात मोठा प्रतिसाद मिळाला परभणी येथील दंगलीत समावेश असल्याचा ठपका ठेवून सोमनाथ व्यंकटी सूर्यवंशी यास न्यायालयीन कोठडी सुनावली होती त्यादरम्यान दि १५ रविवार रोजी सकाळी कोठडीतच सोमनाथ चा मृत्यू झाला त्या निषेधार्थ ढाणकी शहरातील विविध संघटनानी बंद मध्ये सहभाग घेऊन निषेध नोंदविला ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रामराव गायकवाड, संबोधी गायकवाड, खाजाभाई कुरेशी, अमोल तूपेकर, हमीद भाई, स्वप्निल चिकाटे, बाळासाहेब चंद्रे, करण भरणे, विश्वास धुळे, संतोष गायकवाड, विजय गायकवाड, राजेश घुगरे, जॉन्टी विनकरे, हनी घुगरे, तुळशीराम गायकवाड, रमेश गायकवाड, राजू पाटील, अंबादास मुनेश्वर, यांची व अनेक भीमसैनिकांची उपस्थिती या वेळी होती. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणेदार संतोष मनवर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.