मनसे च्या दणक्याने ग्रामीण भागातील विद्युत प्रवाह सुरळीत

सहसंपादक : रामभाऊ भोयर

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या जिल्हाध्यक्ष जयंत कातरकर यांनी एम एस बी कार्यालय पोहना येथे जाऊन निवेदन दिले होते पोहना ग्रामीण भागात शहराच्या तुलनेत पाऊस येण्यापूर्वीच लाईन गायब होत होती परिसरातले सर्व शेतकरी शेतमजूर व ग्राहक त्रस्त होते त्यावेळेस जयंता कातरकर यांच्यापर्यंत ग्राहकांनी व सर्वांनी मिळून तक्रारी पोहोचवल्या व शेतकरी सेनेचे कार्यकर्त्यांशी जयंत कातरकर हे पोहना विद्युत कार्यालयावर धडकले निवेदन देऊन सात दिवसाचा विद्युत मेंटेनन्स साठी वेळ देऊन त्यांना मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिला होता त्या कालावधीत विद्युत महामंडळाच्या अभियंता यांच्याशी चर्चा करून परिसरातल्या विद्युत प्रवाह नेहमीच जात असल्यामुळे त्यावर वेगवेगळ्या मार्गाने दुरुस्त करून तो विद्युत प्रवाह सुरळीत करण्यासाठी अभियंता यांना व कर्मचाऱ्याला विचारात घेऊन परिसरातला विद्युत प्रवाह नियमित बनवण्यामागील कारणे शोधून काढण्यासाठी व त्याचा दुरुस्त करण्यासाठी त्यांना सूचना दिल्या त्या सूचना दिल्याच्या नंतर काही काळातच विद्युत प्रस्ताव करून परिसरात 24 तास विद्युत पुरवठा खंडित न होता सुरळीत चालू झालेला आहे यासाठी अभियंत्याचे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेकडून अभिनंदन करण्यात येत आहे व तसेच ग्राहकाला होणारा त्रास दूर केला या सर्व बाबी त महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष जयंता कातरकर जिल्हा उपाध्यक्ष राजू बोंबले तालुका अध्यक्ष पवन तडस व इतर शेतकरी सेनेचे संपूर्ण कार्यकर्ते यांना सुयश मिळालेले आहे.