
महारोगी सेवा समिती वरोरा द्वारा संचालित आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा येथे अर्थशास्त्र विभागाच्या वतीने “ग्रामीण महाराष्ट्राचे प्रश्न व उपाय” या विषयावर महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मृणाल काळे हे होते.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. किशोर टोंगे, युवा उद्योजक, पुणे यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की,”प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कला कौशल्य असते. आपल्यातील या कला गुणांना व शक्तीला जागृत करून आपण आपले जीवन देदीप्यमान केले पाहिजे व स्वतः संपत्तीच्या बाबतीत आत्मनिर्भर होऊन आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे.”त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी मोलाचे ठरले. आनंदनिकेतन महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मा. निकेश आमने – पाटील ह्यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.त्यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की,”मी खर तर ग्रामीण भागातला.असे असुनही स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात मी यशस्वी ठरलो. ग्रामीण महाराष्ट्राचे प्रश्न जरी अनेक असले तरी त्याचे उत्तर शोधण्यासाठी,त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण धडपड केली पाहिजे.”
अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.नरेंद्र पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.समाजातील वास्तव या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांसमोर ठेवले. अर्थशास्त्र विषयाच्या प्रा.तनुजा वैद्य याही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम ए अर्थशास्त्र २ ची विद्यार्थिनी कु.पल्लवी जीवतोडे हिने तर आभार प्रदर्शन एम ए अर्थशास्त्र भाग १ ची विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा दंडमल हिने केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.मोक्षदा मनोहर – नाईक तसेच, शुभम आमने, माजी विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.
