
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक २२जुलै ते २८ जुलै २०२४ पासून सुरू असलेल्या शिक्षण सप्ताहाचा शेवट २८ जुलै रोज रविवारला समुदाय सहभाग दिवस तथा तिथी भोजन या उपक्रमाने समारोप करण्यात आला.
भारत सरकारच्या शिक्षण विभागाच्या पत्रानुसार महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चा चौथा वर्धापन दिन शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने शाळेत साजरा करण्यात आला. गेल्या आठ दिवसापासून सतत धार पाऊस सुरू असूनही सुद्धा आज समारोप दिवसी मोठया प्रमाणात विद्यार्थी उपस्थित राहून भोजनाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिक्षण सप्ताहाच्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सातही दिवस उत्कृष्ट सहभाग नोंदविला. शनिवारला वृक्षदिंडी सुद्धा काढण्यात आली तिथी भोजनाचा आस्वाद विद्यार्थी शिक्षक पालक व पाहुणे मंडळी यांनी सुद्धा घेतला. या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानीं न्यू एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष बि. के. धर्मे, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव डॉ. अर्चनाताई धर्मे, प्रा. गजानन घुंगरूट,विनय मुनोत, माजी सैनिक संजय एकोणकर मुख्याध्यापक प्रा. जितेंद्र जवादे,उपमुख्याध्यापक विजय कचरे, पर्यवेक्षक सुरेश कोवे त्याच बरोबर शाळेतील असंख्य विद्यार्थी,पालक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर
कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन कु वैशाली चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेश कोवे यांनी केले….