है तैयार हम , राळेगांव पोलीसांचा रूट मार्च

सहसंपादक : रामभाऊ भोयर

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक,डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी आदी सन उत्सवानिमित्त पोलीस स्टेशन राळेगाव च्या वतीने दिं १३ एप्रिल २०२४ रोज शनिवारला साडेपाच ते साडेसहा वाजताच्या दरम्यान राळेगाव शहरात रूट मार्च काढण्यात आला.
नुकत्याच होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व समाजकंटकावर गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरात क्रांती चौक, बस स्टॅन्ड, गोंडपुरा, मेन लाईन, अशा मुख्य मार्गाने रूट मार्च घेण्यात आला आहे. या रूट मार्च करिता पोलीस स्टेशनचे ३ अधिकारी १० कर्मचारी १२ होमगार्ड सीआयएसएफ चे ३ अधिकारी ३६ कर्नाटक पोलीस १ अधिकारी २० कर्मचारी सीआरपी चे १ अधिकारी २३ कर्मचारी आरसीपी १ अधिकारी १९ कर्मचारी असे एकूण ९ अधिकारी व १०८ कर्मचारी तसेच १२ होमगार्ड या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते.