
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव राज्य शासनाने शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसाचा आठवडा केला आहे त्यामुळे दैनंदिन कामाच्या वेळेत वाढ केली आहे नागरिकांची कामे वेळेवर व्हावीत हा त्यामागील उद्देश असे असताना ही काही अधिकारी कर्मचाऱ्यांकडून वेळेचे बंधन पाळले जात नसल्याचे २६ जून सकाळी पाऊणेदहा वाजता केलेल्या पाहणी दरम्यान आढळून आले आहे.
राळेगाव शहरातील महसूल ,कृषी,भूमिअभिलेख,सामाजिक वनीकरण,सार्वजनिक बांधकाम ,तालुका सहायक निबंधक,आधी कार्यालयातील भोंगळ कारभार दिसून आला असून नमूद वेळेत अधिकारी कर्मचारी यायचेच होते.
शासनाने पाच दिवसाचा आठवडा केला असल्याने अधिकारी कर्मचारी यांनी सकाळी ९:४५ वाजता कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे तसेच सायंकाळी ६:१५ ही कार्यालयीन वेळ आहे परंतु पाच दिवसाचा आठवडा असताना सुद्धा सवयीप्रमाणे कार्यालयातील लिटलथिपी सुरूच आहे राळेगाव तालुका हा आदिवासी बहुल भाग असून तालुक्यातील गोरगरीब नागरिक या शासकीय कार्यालयात अनेक कामासाठी येत असतात परंतु अधिकारी कर्मचारी गायब असल्याने तासाने तास नागरिकांना ताटकळत बसावे लागते ही शोकांतिका आहे शासनाद्वारा कामाचा पूर्ण मोबदला दिला जात असताना सेवा का अपूर्ण असा नागरिकांचा सवाल आहे या लेटलथीफी कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भूमी अभिलेख कार्यालय
उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात सकाळी दहा वाजता फेरफटका मारला असता कार्यालयात राठोड हे एकच कर्मचारी आढळून आले तर एक शिपाई असे दोन कर्मचारी या कार्यालयात आढळून आले आहे.
तालुका कृषी कार्यालय
शेतकऱ्यांशी निगडित तालुका कृषी कार्यालय कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक पावणे दहा वाजता कोणीही आलेले नाही फक्त कार्यालयात एकच पर्यवेक्षक बसून दिसलेले आढळून आले.
तहसील कार्यालय तहसील कार्यालयातील विविध विभागातील सकाळी ९:५० मिनिटांनी कार्यालयात गेलो असता कार्यालयात चपराशी व्यतिरिक्त कोणतेही कर्मचारी तसेच तहसीलदार, नायब तहसीलदार कोणीच आढळून आलेले नाही.
तर काही विभागाचे दरवाजे चक्क लोटलेले स्थितीत बंद दिसले यावर कुणाचेच कुणावर नियंत्रण नसल्यासारखा तहसीलचा कारभार असल्याचे आढळून आले बहुतांश अधिकारी कर्मचाऱ्यांचे अपडाऊन बहुतांश कर्मचारी अधिकारी यवतमाळ वर्धा जिल्ह्याच्या ठिकाणावरून अपडाऊन करतात त्यामुळे त्यांना येताना उशीर आणि जाताना लवकर अशी अवस्था असल्याने कामे प्रलंबित असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
सार्वजनिक बांधकाम
या विभागातही शासनाच्या वेळेनुसार चपराशी ऐवजी कोणीही आढळून आले नाही.
सामाजिक वनीकरण विभाग
हे सामाजिक वनीकरण विभागाचे कार्यालय हे कोणालाही दिसण्याजोगे नसून या कार्यालयात १०:१५ वाजता गेलो असता चक्क बंद दिसून आले आहे.
