
सहसंपादक : रामभाऊ भोयर
किसान ब्रिगेड व दैनिक देशोन्नती परिवार यांच्या संयुक्त कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील संपूर्ण तालुका प्रतिनिधी, शहर प्रतिनिधी, विशेष प्रतिनिधी व ग्रामीण भागातील वार्ताहर यांनी २०२४ ते २०२५ या कालावधीमध्ये ज्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली त्या तालुका प्रतिनिधी शहर प्रतिनिधी विशेष प्रतिनिधी व ग्रामीण भागातील वार्ताहर
यांचा दैनिक देशोन्नती चे मुख्य संपादक तथा किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रकाश भाऊ पोहरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असून सदर या कार्यक्रमांमध्ये राळेगाव तालुका प्रतिनिधी महेश दादा शेंडे यांची जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकाची निवड झाली तर ग्रामीण भागातील उत्कृष्ट बातमीदार म्हणून रिधोरा येथील वार्ताहर दीपक पवार यांची जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकाची निवड झाली असल्याने त्यांचा दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक तथा किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मा प्रकाश भाऊ पोहरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. सदर या सत्कार समारंभाला उपस्थित दैनिक देशोन्नतीचे यवतमाळ जिल्हा आवृत्ती प्रमुख अजय गावंडे व जिल्ह्यातील संपूर्ण तालुका प्रतिनिधी शहर प्रतिनिधी विशेष प्रतिनिधी व वार्ताहर उपस्थित होते.
