
सहसंपादक: रामभाऊ भोयर
विधानसभाच्या निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभपणे पार पाडावी या करिता दिं २६ ऑक्टोबर २०२४ रोजी शासकीय धान्य गोदाम व न्यू इंग्लिश हायस्कुल येथे निवडणूक निर्णय अधिकारी विशाल खत्री यांच्या उपस्थिती १ हजार ७५० अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण पार पडले.
राळेगाव विधानसभा ७७ मतदार संघ अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले या प्रशिक्षणा दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी माननीय विशाल खात्री तहसीलदार अमित भोईटे धीरज थुल कळंब यांनी निवडणूक कामकाज संबंधी मतदान यंत्रे हाताळण्याबाबत प्रशिक्षण दिले तसेच प्रशिक्षणाकरिता माननीय जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यांनी सुद्धा निवडणूक कामकाजाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित निवडणूक निर्णय निवडणूक अधिकारी कर्मचारी यांचे जेवणाची व चहा पाण्याची व्यवस्था आहे प्रशिक्षण स्थळीच करण्यात आली होती तसेच प्रशिक्षणानंतर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन गुगल द्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली.
