
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पहिले मराठी दर्पण या वृत्तपत्राचे पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून दिं ६ जानेवारी 2025 रोज सोमवार ला दैनिक आत्मबल च्या कार्यलया येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या विषयी पत्रकारांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी संघटनेचे अध्यक्ष मोहन देशमुख राष्ट्रपाल भोंगाडे, मनोहर बोभाटे, , जेष्ठ पत्रकार प्रकाश मेहता, प्रा. अशोक पिंपरे, फिरोज लाखाणी, मंगेश राऊत, महेश भोयर, विशाल मासुरकर, शालीक पाल, कैलास जी वर्मा , गुड्डू मेहता, दादू भोयर संजय दुरबुडे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
