नेताजी विद्यालय राळेगाव येथे किशोरवयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव येथील नेताजी विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत आरोग्य या विषयावर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ सविता पोटदुखे यांनी किशोरवयीन मुलींचे आरोग्य, मासिक पाळी व्यवस्थापन तसेच लहान वयात आलेल्या लठ्ठपणा, मधुमेह आणि डोळ्यांचे विकार आदी आजारांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच विद्यार्थ्यांना बाहेरच्या खाण्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली मोबाईलचा अतिवापर करणे शरीराचा व्यायाम न करणे सतत बैठे खेळ खेळणे या कारणांमुळे शरीराची वाढ योग्य पद्धतीने होत नसल्याने त्यांनी विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम.ए.केवटे मॅडम , होत्या सुत्रसंचालन आर.डी सिडाम व आभार प्रदर्शन नागरे मॅडम यांनी केले तसेच एम.डी सोनेने , एस.एस चावट, एस बी वानखेडे आदींनी कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले