मेट गावात होणार व्यायामशाळा, काम जोमात सुरू आहे! सरपंच यांच्या प्रयत्नांना यश….!


    लोकहित महाराष्ट्र उमरखेड
    तालुका प्रतिनिधी: संदीप बी. जाधव


    श्री विक्रम उत्तम राठोड सरपंच यांनी मेट गावामध्ये व्यायाम शाळा झालीपाहिजे, यासाठी सतत चार वर्ष धडपड करून, श्री माननीय, आमदार. नामदेवजी ससाने साहेब व नितीनजी भूतडा यांना निवेदन व सतत पाठपुरवठा देऊन, डी .पी .डी .सी. अंतर्गत मंजुरात करून घेतले. विक्रम भाऊ युवा नेता असल्याकारणाने युवकांच्या भविष्यासाठी शरीर सृष्टी प्रबळ आणि पिळदार बनविण्यासाठी मेट या गावामध्ये व्यायाम शाळेची पक्की इमारत बांधकाम व साहित्यासाठी 14 लाख रुपये मिळवून दिले. व इमारत बांधकाम नमूद जागा पूर्वेस मुख्य सिमेंट रोड ढाणकी ते फुलवसांगी, उत्तरेस गोविंदपुर रोड, पश्चिमेस संत सेवालाल मंदिर, आणि दक्षिणेस ग्रामपंचायत कार्यालय अशी सुसज्ज इमारतीचे बांधकाम जोमात सुरू आहे.
    श्री. उत्तम मोहनसिंग राठोड माझी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सैनिक यांनी, विद्यार्थी व युवकाचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी नामे, श्री वसंतराव नाईक वाचनालय जन सुविधा अंतर्गत मंजूर करून दिले.
    मेट येथील विद्यार्थ्यांचं उज्वल भविष्य घडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत, शारीरिक व मानसिक दृष्ट्या रीतीने संपूर्ण आधार मिळून दिलेला आहे. युवकांचे प्रबळ व बुद्धिमान भविष्य घडावे याकरिता सतत प्रयत्न करीतच असतात.