
प्रतिनिधी::यवतमाळ
प्रवीण जोशी
येणाऱ्या स्थानिक निवडणुका ह्या नेत्याच्या प्रतिष्ठा जपण्यासाठी असतात यातूनच नेत्याची स्थानिक पातळीवर पकड किती मजबूत आहे हे निदर्शनास येऊन पक्षश्रेष्ठीवर सुद्धा या माध्यमातून आपल्या कामाचा वर चेष्मा राहून येणाऱ्या निवडणुकीत विश्वासात घेऊन धोरण नीती व भविष्यातील पंचायत समिती, ग्रामपंचायत, आणि जिल्हा परिषद निवडणुका होतात त्याला अनुसरून उमेदवारी देताना या निवडणुकीत उत्कृष्ट निकाल व दिशा दिल्यास पक्ष उभारणीत मदत केल्याचा नक्कीच फायदा होतो. त्यामुळे अनेक नेते या निवडणुकीसाठी आटापिटा करताना दिसले ज्यांना आमदारकी पंचायत समिती व सर्व पदे एकाच घरात दिले असताना कोण्या एकाला आसमान दाखवण्यासाठी पक्षाच्या सर्व धोरणांना बासनात गुंडाळून ठेवले व पक्षाप्रती बेगडी प्रेम पाहायला मिळाले.
दिनांक १८ जून रोजी जिनप्रेस मतदान पार पडले यात दोन्ही गटाच्या उमेदवाराचे भविष्य बंद झाले व विजयाची उत्सुकता उमेदवारासह मतदातांना सुद्धा लागलेली दिसत आहे. यावेळी वयाने वयोवृद्ध असलेल्या सभासदांना मतदानाचा हक्क बजावता यावा साठी वाहने उपलब्ध करण्यात आली असली तरी मतदान केंद्राच्या ठिकाणी काही अंतरावरच मतदाराला सोडल्यानंतर मतदान खोलीपर्यंत नेण्यासाठी जी यंत्रणा लागत होती ती उपलब्ध नव्हती फक्त मताचा विचार होताना दिसला राजकीय नेत्यांनी वयोवृद्ध आजारी असलेल्या मतदारांना नेत्यांकडून मदतीचा अभाव दिसला पण नेहमीप्रमाणे पोलीस दादांनी माणुसकी दाखवली यावेळी मतदान केंद्रावर प्रचंड शांतता बघायला मिळाली पोलीस बंदोबस्त चोख असल्यामुळे बिटरगाव (बु) चे ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कपिल मस्के, बीट जमा. मोहन चाटे बीट जमा. गजानन खरात, निलेश भालेराव, संतोष चव्हाण, दत्ता कुसराम, संतोष मुडे, प्रकाश मुडे व प्रवीण जाधव असा कडक पोलीस ताफा तैनात केला होता
बूथ क्रमांक १०येथे४०८पैकी३१३, ७७/टक्के मतदान झाले तर बूथ क्रमांक११वर३७०पैकी३०६…८२/टक्के मतदान झाले.
